चंद्रपूर: कोरोना काळात अभ्यासीका बंद होत्या. त्यांनतर अभ्यासिका सुरु झाल्यात मात्र त्याचे शुल्क सर्व सामान्य विद्यार्थ्यांना न परवडण्यासारखे होते. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही निशुल्क दरात उत्तम अभ्यास करता यावा याकरिता 11 अभ्यासीका तयार करण्याचा संकल्प मी केला. आज यातील दुस-या अभ्यासीकेचे भूमिपूजन संपन्न झाले आहे. त्यामुळे गरिब गरजू विद्यार्थ्यांसाठी निशुल्क अभ्यासिका उभारण्याच्या स्वप्नपूर्तीकडे वेगाने वाटचाल होत असल्याचा मला आनंद होत असल्याचे प्रदिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
नगरसेवक पप्पू देशमूख व स्थानिक नागरिकांच्या मागणी नंतर नानाजी नगर दत्त मंदिर येथे स्थानिक आमदार विकास निधीतून 25 लक्ष रुपयांची अभ्यासीका मंजूर करण्यात आली आहे. आज रविवारी या अभ्यासीकेचे भुमिपूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. युपीएससीच्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन चंद्रपूरचे नाव लौकिक करणा-या अंशुमन यादव यांच्या हस्ते या कामाचे भुमिपूजन करण्यात आले. यावेळी अंशुमन यादव आणि गडचिरोलीचे उपशिक्षणाधिकारी स्नेहल अशोक काटकर यांची सत्कामूर्ती म्हणून तर मनपा सभागृह नेता देवानंद वाढई, जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा मनपा नगर सेवक पप्पू देशमूख, वडगावच्या नगर सेविका सुनिता लोढीया, शंकर क्रिडा व सांस्कृतीक मंडळचे अध्यक्ष विनोद निखाडे, मनोज भैसारे, घनश्याम येरगुडे, अमर यादव आदिंची प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूर शहरातील शेवटच्या भागांचा विकास करण्याच्या दिशेने माझे प्रयत्न सुरु असून यासाठी मोठा निधी आपण उपलब्ध केला आहे. या निधीतून या भागात पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जात आहे. कोरोना काळात रुग्णांच्या सेवेसाठी आपण नवीन चार रुग्णालय सुरु केले. सर्व सामान्यांना आवश्यक असणा-या सोयी सुविधा उपलब्घ करुन देणे ही आमच्या विकासाची परिभाषा असल्याचे ते यावेळी म्हणाले, नगरसेविका सुनिता लोढीया यांच्या प्रभागात सार्वजनिक सभागृहासाठी 30 लक्ष रुपये देणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी बोलतांना केली. हे सर्व विकास कामे होत असतांना शिक्षण क्षेत्रातही भरिव काम करण्याचा मानस असल्याचे ते यावेळी म्हणाले. २५ लक्ष रुपयातून साकार होत असलेल्या या अभ्यासिकेतील पुस्तकांसाठी आणखी १० लक्ष रुपयांची घोषणाही यावेळी त्यांनी केली. चंद्रपूरचा विद्यार्थी शिकला पाहिजे, त्याने चंद्रपूर जिल्हाचे नाव लौकिक केले पाहिजे हि सर्वांची अपेक्षा आहे. मात्र यासाठी सदर विद्यार्थांना तसे वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी हि आपली आहे. त्यामुळे या अभ्यासिकेत विद्यार्थांना योग्य मार्गदर्शन केल्या जावे अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
चंद्रपूरात मोल मजूरी करणारा कष्टकरी वर्ग मोठा आहे. या वर्गातील विद्यार्थ्यांना महागड्या अभ्यासीकेत प्रवेश घेणे न परवडण्यासारखे आहे. त्यामुळे आपण सदर विद्यार्थांना निशुल्क दरात उत्तम अभ्यास करता यावा या करिता 11 अभ्यासिका तयार करण्याचा संकल्प घेतला आहे. त्यातील 5 अभ्यासिका मंजूर झाल्या आहे. सदर अभ्यासिका या सर्व सोयी सुविधांनी सज्ज असणार असून ठरावीक वेळेत पूर्ण होणार असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखविला. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.