दुर्गापूर येथील घटनेने शहर हादरले
चंद्रपुर: जनरेटर धूर गळतीमुळे एकाच परिवारातील 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे, दुर्गापूर येथील कंत्राटदार रमेश लष्कर सहित कुटुंबातील 6 जणांचा या धुरी मुळे मृत्यू झाला, मृतकांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे.
दूर्गापुर येथील कंत्राटदार रमेश लष्कर यांच्यासहीत कुटुंबातील सहा जणांचा जनरेटरमधील गॅस गळतीमुळे मृत्यु झाला. मृतांमध्ये अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) यांचा समावेश आहे. दहा दिवसांपूर्वी या कुटुंबात विवाह झाला होता. दरम्यान डॉक्टर विषबाधेमुळे मृत्यु झाल्याचे सांगत आहे.
रात्री दुर्गापुरातील काही भागातील वीज पुरवठा गेल्याने रमेश यांनी जनरेटर सुरू केला, वीज न आल्याने जनरेटर सुरूच होता, रात्री पाऊस सुरू आल्याने जनरेटर सुद्धा घरातील आतील भागास ठेवण्यात आला असल्याने त्यामधून निघणारा धूर लष्कर कुटुंबासाठी जीवघेणे ठरले, त्या धुरामुळे 6 जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती पुढे आलेली असून कुटुंबातील 1 सदस्य यामधून बचावला असून त्यांचेवर उपचार सुरू आहे.