चंद्रपूर : ओबीसींचे आरक्षण रद्द होण्यामागे राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार जबाबदार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली. मात्र, केंद्र सरकारने ती दिली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण रद्द केले आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होणे म्हणजे संपूर्ण ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजपचा घाट असल्याचा आरोप चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केला आहे.
ओबीसींच्या आरक्षण रक्षणासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आज २६ जूनला राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी सामाजिक न्यायदिनाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व ग्रामीण जिल्हा कमिटीच्या वतीने गांधी चौक येथे केंद्र सरकारविरोधात आंदोलन करीत निषेध नोंदविण्यात आला. यावेळी रितेश (रामू) तिवारी बोलत होते.
रितेश (रामू) तिवारी पुढे म्हणाले, केंद्रातील मोदी सरकार मागील सात वर्षांत सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. केवळ हुकूमशाही पद्धतीने कारभार चालविला जात आहे. मागील काही वर्षांत ओबीसी समाज सत्तेत पोहोचला आहे. ही बाब भाजपच्या नेत्यांना पचनी पडत नाही. त्यामुळे या समाजाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात ओबीसींची आकडेवारी सादर केलेली नाही.
यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, नगरसेविका सुनीता लोढिया, ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस उमाकांत धांडे, अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, एनएसयूआयचे प्रदेश महासचिव कुणाल चहारे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनात आंदोलन पार पडले.
आंदोलनात माजी सभापती संतोष लहामगे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल, नगरसेवक नीलेश खोब्रागडे, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, माजी नगरसेवक पितांबर कश्यप, अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्ष अनुताई दहेगावकर, नगरसेवक नंदू नागरकर, अनुसूचित जाती विभागाच्या शहर अध्यक्ष शालिनी भगत, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर, प्रदेश सचिव रुचित दवे, शहर महिला काँग्रेस उपाध्यक्ष स्वाती त्रिवेदी, शहर उपाध्यक्ष सुनंदा धोबे, असंघटित कामगार विभाग जिल्हाध्यक्ष विनोद संकत, माजी नगरसेवक राजू रेवल्लीवार, माजी नगरसेवक पिंटू शिरवार, शहर सचिव वाणी डारला, सदस्य संध्या पिंपळकर, ब्लॉक अध्यक्ष शीतल काटकर, लता बारापात्रे, अनुसूचित जाती विभागाचे शहर अध्यक्ष कुणाल रामटेके, उपाध्यक्ष सुनील पाटील, युवक काँग्रेस सचिव कादर शेख, माजी नगरसेविका वंदना भागवत, मोहन डोंगरे, राजू वासेकर, विजय धोबे, अजय बल्की, संजय रत्नपारखी, बापू अन्सारी, पप्पू सिद्दीकी, अशोक गड्डमवार, सुधीर पोडे, साबीर सिद्दीकी, तवंगर खान, केशव रामटेके, संदीप धडसे, दिनेश कोडी, राहुल पांडे, केतन दुरसेलवार, मोनू रामटेके, वैभव येरगुडे, नितीन चौधरी, काशिफ अली, आकाश कराटे, पराग मेश्राम, अमर आकवान, अनिकेत वाळके, आसिफ शेख, राहुल झाडे, सागर वानखेडे, सौरभ ठोंबरे, निसारभाई, साजन सरावार, कृष्णा वरघने, प्रिया चंदेल, सुचिता काटकर, माया पहाणपटे, कमलाबाई वाढइ, बेबी झाडे, डेझी सोबदुळे, आम्रपाली ढोले, पल्लवी पोटवार, मनीषा झाडे, पायल दुर्गे, अनिता दातार, परवीन सय्यद, शारदा यादव, वंदना बेले, पायल माणूसमारे, लता जांभुळकर, किरण जुनघरे, सलीम शेख, वैशाली जोशी, राहुल ताजने, तोसीफ खान, सुलतान भाई, गणेश दिवसे, निलेश पिंगे, ऋषभ दुपारे, धीरज उरकुडे, आशिष आडे, राकेश पिंपळकर, रुपेश देरकर, विशाल भगत, मनोज कैथवास, स्वप्नील टोंगे, संतोष बोरकर, प्रवीण मेश्राम, शुभम उरकुडे, गणेश रणदिवे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.