चंद्रपुर दि. 23 एप्रिल : आज दि.23 एप्रिल 2021 रोजी चंद्रपूर जिल्हयासाठी प्राप्त झालेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचे रूग्णालय निहाय वाटप करण्यात आलेले आहे. संबंधीत कोविड रूग्णालयांनी त्यांचे नावासमोर दर्शविण्यात आलेल्या संख्येप्रमाणे व औषध पुरवठादारनुसार त्यांचेकडून तात्काळ रेमडेसिवीर इंजेक्शन शासनाने निश्चित केलेल्या दराने प्राप्त करून घ्यावेत. याबाबत कोणतीही सबब चालणार नाही. कोणत्याही प्रकारची दिरंगाई, टाळाटाळ, कसूर होणार नाही याची दक्षता रुग्णालय प्रशासन व घाऊक विक्रेते यांनी घ्यायची आहे. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
संबंधित कोवीड रूग्णालयांनी सदरचा औषध साठा प्राप्त करून घेणेकामी रूग्णालयाच्या लेटरहेड वर सही शिक्क्यानिशी प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीचे फोटो ओळखपत्र घाऊक विक्रेत्याकडे सादर करणे आवश्यक आहे. याबाबतची खातरजमा करून घाऊक विक्रेत्यांनी औषधाचे सुयोग्य वितरण सदर आदेशाचे दिनांकास मुदतीत व शासकीय- वाजवी दरात करणेचे आहे.
चंद्रपूर महानगरपालिका, जिल्हा शल्य चिकीत्सक, चंद्रपूर, सहा.आयुक्त अन्न व औषध प्रशासन,चंद्रपूर यांनी याबाबत व संबंधीत आरोग्य यंत्रणेचे प्राधिकृत आरोग्य अधिकारी यांनी सदर वितरण तक्त्यानुसार वाटप होत असलेची व सदर वितरीत औषधांचा उचित विनियोग होत असल्याची वेळोवेळी खातरजमा करून अनियमितता आढळल्यास संबंधितावर कारवाई करावी.
भरारी पथकांनी वाटप तक्त्यानुसार वाटप व विनियोगाबाबत खातरजमा करून अनियमितता आढळल्यास संबंधित रुग्णालय प्रशासन व घाऊक विक्रेते यांचेवर नियमानुसार कार्यवाही करून अहवाल सादर करावा.
ही आहेत रुग्णालयांची नावे :-
आईकृपा मेडिकल-पोटदुखे हॉस्पिटल, आस्था मेडिकल-मुरके हॉस्पिटल, गुरुकृपा फार्मसी-कोलते हॉस्पिटल, रजन मेडिकल-नगराळे हॉस्पिटल, सागा मेडिकल-बुक्कावार हॉस्पिटल, श्वेता हॉस्पिटल, स्पंदन मेडिकल-मानवटकर हॉस्पिटल, आरोग्यम् मेडिकल-पंत हॉस्पिटल, सीएचएल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, क्राइस्ट हॉस्पिटल, गजानन मेडिकोज-डॉ. कल्याणी दीक्षित हॉस्पिटल, कीर्ती मेडिकल-झाडे हॉस्पिटल, लाईफ लाईन मेडिकल-शिवजी हॉस्पिटल, मधुपुष्पा मेडिकल-गुलवाडे हॉस्पिटल, मनोलक्ष्मी मेडिकल-साई डिवाईन केअर, शांतीज्योत हॉस्पिटल, तिरुपती मेडिकल-बेंडले हॉस्पिटल, उदय मेडिकल-कोलसिटी हॉस्पिटल, उज्वल मेडिकल,विमलादेवी मेडिकल कॉलेज, उज्वल मेडिकल-डॉ. पी. संगीता, गुरुदृष्टी मेडिकल-डॉ. चेतन खुटेमाटे, जयेश मेडिकल-यशोधन रुग्णालय ब्रह्मपुरी, आस्था मेडिकल-आस्था मल्टीस्पेशालिटी ब्रह्मपुरी, ख्रिष्तानंद हॉस्पिटल ब्रह्मपुरी, तारा मेडिकल-ब्रह्मपुरी, व्यंकटेश मेडिकल-सर्वोदय हॉस्पिटल ब्रह्मपुरी, चिंतामणी मेडिकल-भद्रावती.