चंद्रपूर: पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे आज (शनिवारी) पहाटे कोरोनामुळे निधन झाले. सर्व माध्यमांशी व पत्रकारांशी अत्यंत सलोख्याचे संबध असलेले शासकीय अधिकारी अशी त्यांची ओळख होती.
मनमिळावू, सतत दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून येणारा माणूस असा सरग यांचा नावलौकिक होता. त्यांच्या निधनामुळे माहिती खात्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सरग यांचा माध्यम क्षेत्राशी मोठा संपर्क होता. सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. मागील रविवारी त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले. त्यातच हाय शुगर डिटेक्ट झाली. शेवटपर्यंत शुगर लेव्हल खालीच आली नाही. अखेर त्यांचे निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!