चंद्रपूर:महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आज विदर्भाच्या दौ-यावर आहे. या निमीत्य आज त्यांचे नागपूर येथील विमानतळावर आगमन झाले असता आमदार किशोर जोरगेवार यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज विदर्भाच्या दौ-यावर आहे. या दरम्याण चंद्रपूर जिल्हातील नागभिड तालुक्यातील गोसीखुर्द या सिंचन प्रकल्पाच्या धरणाची पाहणी ते करणार आहे. 32 वर्षापूर्वी भुमीपूजन झालेल्या गोसेखुर्द या महत्वाकांक्षी सिंचन प्रकल्पाचे काम अदयापही पूर्ण झालेले नाही. मात्र आता मुख्यमंत्रीच या कामाची पाहणी करण्यासाठी येत असल्याने रेंगाळलेला या प्रकल्पाचे काम मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्याण नियोजीत कार्यक्रमानूसार आज ते नागपूर विमानतळावर पोहचले असता आमदार किशोर जोरगेवार यांनी विमानतळावच त्यांची भेट घेत पूच्छगूच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात.