उपवर – वधू परिचय मेळावा, कुणबी समाज मंडळाचे आयोजन
चंद्रपूर:कोणत्याही समजाचा विद्यार्थी परिस्थीतीमुळे शिक्षणापासून वंचित राहायला नको अशी माझी भुमीका असून समाजातील गरिब गरजू विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क न देता निशुल्क अभ्यास करता यावा या करीता अभ्यासीकांची निर्मीती करण्याचे माझे प्रयत्न सुरु असल्याचे सांगत कुणबी समाजालाही अभ्यासीकेसाठी 50 लक्ष रुपये देणार असल्याची घोषणा आ. किशोर जोरगेवार यांनी केली.
कुणबी समाज मंडळाच्या वतीने चंद्रपूर येथील धनोजी कुणबी समाज भवन येथे राज्यस्तरीय उपवर – वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला कुणबी समाज मंडळ तथा आयोजक समीतीचे अध्यक्ष अॅड. . पुरुशोत्तम सातपुते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, मनपा गटनेते डाॅ. सुरेश महाकुलकर, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे दिनेश चोखारे, नगर सेविका सुनिता लोढीया, डाॅ अभिलाषा गावतूरे, नगर सेवक वाढई, अॅड. मोरेश्वर टेंभुर्डे,यांच्या सह ईतर मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, कुणबी समाज हा सामाजीक उपक्रमात समाज बांधवांचे प्रबोधन करणारा समाज असून याचा मोठा फायदा समाजीतील युवा पिढींला होणार आहे. या समाजाच्या वतीने दरवर्षी आयोजीत होत असलेल्या उपवर – वधू परिचय मेळाव्यातून पालकांना कमी वेळ खर्च करुन उत्तम स्थळ शोधणे शक्य होत आहे. सुसंस्कृत समाजासाठीही असे आयोजन काळाची गरज असल्याचे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले, माना टेकडी येथील जगन्नाथ बाबा मठ येथे आपण तीन कोटी रुपये खर्च करुन सौंदर्यीकरण करत आहो. शहरातील अशा अनेक शेवटच्या भागातील विकासासाठी माझे प्रयत्न सुरु आहे. मात्र हे विकास कामे करत असतांना शिक्षण क्षेत्रावरही माझा भर आहे. या क्षेत्रात मला भरिव असे काम करायचे आहे. खाजगी अभ्यासीकेतील शुल्क अधिक असल्याने गरिब गरजू मुले त्याकडे पाठ फिरवत आहे. मात्र परिस्थितीमुळे त्याला अभ्यासासाठीच्या पूरक गोष्टी उपलब्ध होत नसेल तर हि चिंते सह चिंतनाची बाब आहे. याबात समाजातील पूढा-यांनी चिंतन केले पाहिजे. कुणबी समाजाने मला जागा उपलब्ध करुन दयावी त्या ठिकाणी समाजीतील मुलांसाठी अभ्यासीका उभारण्यासठी 50 लक्ष रुपये मि देणारे अशी घोषणाही त्यांनी यावेळी बोलतांना केली. मी समाजाच्या पाठीशी सदैव राहील आता मेळावा झाला त्यानंतर सामूहिक लग्न मेळावाही आयोजित करावा तेव्हाही आपण येऊ असे ही यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले.