नागपूर २६ :प्रवाशांच्या सोइ करता महा मेट्रो तर्फे सातत्याने अनेक विविध उपाय केले जातात. या अंतर्गत मेट्रो ट्रेन मध्ये सायकल ने प्रवास करणे, सेलिब्रेशन ऑन व्हील्, फिडर सारख्या अनेक विविध उपाय योजना महा मेट्रो तर्फे प्रवाश्यांकरता केल्या आहेत. या सर्व योजनांना नागपूरकरांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे.
याच अंतर्गत रविवारी म्हणजे उद्या सुट्टीच्या दिवशी शहर भ्रमणाला निघालेल्या विदर्भवासियांकरिता महा मेट्रोने संगीताची मेजवानी ठेवली आहे. महा मेट्रो च्या सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन येथे दुपारी १२ ते ३ वाजे पर्यंत केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलातर्फे बँड वेदनांचा कार्यक्रम ठेवला आहे. तसेच संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान नागपूरच्या नावाजलेल्या सचिन आणि सुरभी ढोमणे यांच्या सूर संगम संस्थेतर्फे गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केला आहे.
महा मेट्रो च्या प्रवासी सेवेला विदर्भवासी प्रतिसाद देत आहे. रविवारी हा प्रतिसाद किती तरी पटीने जास्त असतो. या आपुलकीची परतफेड करण्याकरता महा मेट्रो तर्फे विविध प्रकारचे १० स्टॉल्स देखील सीताबर्डी इंटरचेंज येथे लावण्यात येणार आहेत. यात खाण्याकरता विविध प्रकारचे, तसेच शॉपिंग करता देखील स्टॉल असतील. या शिवाय आयुर्वेदिक तसेच पर्यावरण पूरक वस्तू देखील विक्रीला असतील. विदर्भकरांनी राईड करून या सर्व सोईंचा लाभ घ्यावा, असे आवाहन महा मेट्रो तर्फे करण्यात येत आहे.