चंद्रपूर-मूल मार्गावर भरधाव कारची ट्रॅक्टरला धडक, 4 जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

चंद्रपूर,16 डिसेंबर:चंद्रपूर-मूल महामार्गावर मंगळवारी मध्यरात्री भरधाव कारने ट्रॅक्टरला धडक दिली. बर्थडे पार्टीवरुन घरी येताना हा भीषण अपघात झाला.या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर वाढदिवस असलेला मित्र गंभीर जखमी आहे. ही धडक इतकी भीषण होती, की कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. मृतांमध्ये मूल येथील तांदूळ व्यापारी राजू पटेल यांचा मुलगा स्मिथ आणि इतरांचा समावेश आहे.
योग गोगरी या तरुणाचा 23 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व मित्र हॉटेलमध्ये गेले होते. चंद्रपुर रोडवरील एका हॉटेलमध्ये बर्थडे सेलिब्रेशन केल्यानंतर रात्री उशिरा सर्व जण घरी येण्यासाठी निघाले होते. चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूर भागातून जाताना एक ट्रॅक्टर अचानक शेतातून मुख्य मार्गावर आला. वेगात असलेली गाडी ट्रॅक्टरवर धडकल्यानंतर तिचा अक्षरशः चुराडा झाला.
या अपघातात दर्शना उधवाणी (25), प्रगती निमगडे (24), मोहम्मद अमन (23) आणि स्मित पटेल (25) या चौघांचा मृत्यू झाला. तर बर्थडे बॉय योग गोगरी (23) हा जखमी झाला असून त्याच्यावर चंद्रपुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here