उद्या वरोरा शहरात ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने दुचाकी रॅली 

वरोरा : ओबीसी स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे याकरिता २६ नोव्हेंबर रोजी चंद्रपुरात विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या जनजागृती करीता २५ नोव्हेंबर रोजी बुधवारला वरोरा शहरात दुचाकी वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
२६ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर निघणाऱ्या ओबीसी रॅली व २५ नोव्हेंबर रोजी वरोरा शहरातून काढण्यात येणाऱ्या दुचाकी वाहन रॅली संदर्भात खासदार बाळू धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन नियोजन करण्यात आले होते. यावेळी मनसे नेते रमेश राजूरकर, बाजार समिती सभापती राजेश चिकटे, उपसभापती देवानंद मोरे, जी. प सदस्य सुनंदा जीवतोड यांची उपस्थिती होती. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता वरोरा – चंद्रपूर मार्गालगतच्या शासकीय विश्रम गृहाजवळ दुचाकी वाहन रॅली निघणार आहे. वाहन रॅली आनंदवन चौक, रेल्वे स्टेशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मत्ते रुग्णालय,  नेहरू चौक, चिकन मार्केट, साई मंगल कार्यालय- कामगार चौक, मिलन चौक, फिल्टर टॅंक तुळाना रोड, जुनी पाणी टाकी, माढेळी रोड – खेमराज कुरेकार – राजीव गांधी चौक – बँक ऑफ महाराष्ट्रा, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, डोंगरवार चौक त्यानंतर महात्मा गांधी चौकात समारोप करण्यात येणार आहे. तरी या दुचाकी वाहन त्यालीमध्ये पुरुष, महिला, युवक, युवतींना मोठ्या प्रमाणात उपस्थित तसेच २६ नोव्हेंबरच्या चंद्रपूर रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here