अनाथ बालकांना प्रमाणपत्राचे वाटपासाठी विशेष मोहिम

14 ते 30 नोव्हेंबर पंधरवाड्यात देणार अनाथ प्रमाणपत्र

चंद्रपूर, दि. 7 नोव्हेंबर : बाल न्याय अधिनियम 2015 अंतर्गत शासकीय व स्वयंसेवी बालगृह, अनाथाश्रमात प्रवेशित आजी, माजी बाहेर पडलेल्या मुलांना त्यांच्या शैक्षणिक व इतर सवलती मिळणे आवश्यक आहेत. त्यासाठी अशा पात्रताधारक अनाथ मुलांना कागदपत्राअभावी अडचण उद्भवू नये म्हणून अनाथ प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. यासाठी  महिला व बाल विकास विभागाच्या वतीने  दि. 14  ते 30 नोव्हेंबर या पंधरवाड्यात विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
याकरीता सर्व बालगृह स्तरावर अधीक्षक, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता या सर्व कर्मचाऱ्यांचा एक मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. विशेष यंत्रणेमार्फत आई-वडीलांचा शोध घेऊन त्यापैकी कोणीच हयात नसल्याची खात्री करण्यात येईल. त्याबाबतचे संस्थेचे अधीक्षक यांचे प्रमाणपत्र महिला व बालविकास अधिकारी प्रमाणीत करतील. त्यानंतर बालकल्याण समितीने आई-वडील हयात नसल्याचे व लाभार्थी अनाथ असल्याचे चौकशीअंती प्रमाणित करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी बालकल्याण समितीने जन्म-मृत्यू नोंद रजिस्टर, शाळा सोडल्याचा दाखला, प्रवेश निर्गम रजिस्टरचा दाखला ग्राह्य धरावा.
उपरोक्तप्रमाणे निकष पुर्ण करणारे मुल ज्या संस्थेत आहे, त्या संस्थेच्या अधीक्षकांनी अनाथ प्रमाणपत्र मिळण्याबाबतचा प्रस्ताव महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे सादर करावा.  या सर्व प्रस्तावांची छाननी करुन स्वयंस्पष्‍ट शिफारशीसह प्रस्ताव संबंधित उपायुक्तांकडून महिला बालविकास विभागाकडे पाठवावा व विभागाने अनाथ प्रमाणपत्र स्वाक्षरी करुन वितरीत करण्याची कार्यवाही करावी, असे महिला व बालविकास आयुक्त विभागाने कळविले असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश टेटे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here