काँग्रेसकडून मोदी व योगींच्या पुतळ्याचे दहन, मोदी विरोधात निदर्शने
चंद्रपूर : सामूहिक बलात्काराची शिकार झालेल्या हाथरस पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या गाड्या उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवल्या. या दरम्यान, यूपी पोलिसांकडून राहुल गांधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. हा प्रकार मोदी सरकारने मुद्दामून घडवून आणला असून हि मोदी सरकारने लोकशाहीची गळचेपी केली असल्याच्या आरोप चंद्रपूर शहर काँग्रेसने केला आहे. आज गांधी चौक येथे मोदी सरकारच्या विरोधात घोषणा व मोदींच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री विजय वड्डेटीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, चंद्रपूर शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे,जेष्ठ नेते विनोद दत्तात्रय,शहर महिला कांग्रेस अध्यक्ष सुनीता अग्रवाल,बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी,दिलीप माकोडे,माजी शहराध्यक्ष नंदू नागरकर,नगरसेविका सुनीता लोढीया,युवक कांग्रेस चे रूचित दवे, हरिश कोत्तावार, सचिन कत्याल,किसान सेलचे जिल्हाध्यक्ष रोशन पाचारे,शहराध्यक्ष भालचंद्र दानव,प्रसन्न शिरवार,कुणाल चहारे,पप्पू सिद्दिकी,मीनल शर्मा,राजु वासेकर,धरमु तिवारी,अनीश राजा,आकाश तिवारी,साबिर सिद्दीकी,यश दत्तात्रय,काशिफ अली,नौशाद शेख,कादर शेख, आदि उपस्थित होते.
‘हाथरसनंतर आता बलरामपुर मध्येही एका मुलीवर सामूहित बलात्कार आणि निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हा मोठा अपराध आहे. भाजप सरकारने बलरामपुरमध्ये हाथरससारखा निष्काळजीपणा करु नये, तर गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी तसेच राहुल गांधी यांना धक्काबुक्की करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबन करण्याची मागणी चंद्रपूर शहर काँग्रेसने केली आहे.