चंद्रपूर : मोठ्या प्रमाणात मागील पाच महिन्यापासून कोरोना विषाणूचे सावंट होते. त्यामुळे अनेक महाविद्यालये व वाहतुकीची व्यवस्था या काळात नव्हती त्यामुळे मुलांना प्रवेश अर्ज करणे कठीण झाले होते. मात्र आता प्रवेश अर्जाची तारीख जात असल्यामुळे विद्यार्थ्याच्या भविष्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महाविद्यालयात प्रवेश अर्ज भरण्याची मुदतवाढ करून विध्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी कुलगुरू यांच्या कडे केली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाची घडी विस्कटली आहे. लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या ठिकाणाहून येणाऱ्या विध्यार्थ्यांना महाविद्यालयात येऊन प्रवेश अर्ज भरणे शक्य नव्हते. त्यासोबतच विद्यापीठ व महाविद्याने आपले कामकाज बंद ठेवले होते. त्यामुळे बाहेर गावातील विध्यार्थ्यांना देखील प्रवेश अर्ज भरण्याकरिता
आता कालावधी कमी असल्यामुळे महाविद्यालयाच्या समोर विध्यार्थ्याच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव होण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे महाविद्यालयात प्रवेश अर्ज भरण्याची मुदतवाढ करून विध्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी कुलगुरू यांच्या कडे केली आहे. या निर्णयामुळे हजारो विध्यार्थ्यांना लाभ होणार आहे.