चंद्रपूर,19 सप्टेंबर:चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची चंद्रपूर जिल्ह्यातून बदली झाली, त्यांनी या जिल्ह्यात तीन वर्षे सेवा दिली. अनेक उत्कृष्ठ कामे त्यांनी या जिल्ह्यात केली आहे. काल शुक्रवार दिनांक 18 रोजी पोलीस विभागांनी त्यांचा निरोप समारंभ घेतला. अत्यंत आदराने त्यांना खुल्या जीपमध्ये बसवून ती जीप हार-फुलाने सजवून पोलीस मुख्यालयापासून तर पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यापर्यंत स्वतः पोलीस कर्मचारी यांनी “डोहारून” नेली. या निरोप समारंभ प्रसंगी शासनाच्या नियमांची मात्र अवहेलना झाली. सोशल डिस्टन्सिग चे पालन झाले नाही, फारचं कमी अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर मास्क होता. शासन ओरडू-ओरडू सांगताहेत की कोरोना पासून स्वत:ला व इतरांना सुरक्षित ठेवायचे असेल तर नियमांचे आवर्जून पालन करा. एस.पी. साहेब तीन वर्षाच्या आपल्या सेवेमध्ये कोरोना काळातील आपले कार्य हे विशेष राहिले कारण आपण वैद्यकीय क्षेत्रातील आहात, आपल्यामुळे व चंद्रपूर जिल्ह्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या योग्य नियोजनामुळे चंद्रपूर जिल्हा बाकी जिल्ह्याच्या तुलनेत सर्वाधिक सुरक्षित होता. ही गोष्ट जिल्हावासी कधीच विसरू शकणार नाही. परंतु काल झालेला आपला निरोप समारंभ याला अपवाद राहिला. हा टाळु पण शकता येत होता. बाकी जिल्ह्यामध्ये पण बदल्या झाल्या आहेत, त्या ठिकाणी फार कमी असे निरोप समारंभ बघायला मिळतात. नुकतेच चंद्रपूर जिल्हाधिकारी डॉ. खेमणार यांच्या आकस्मिक बदलीनंतर जिल्ह्यात अत्यंत भावनिक वातावरण होते, साध्या समारोपाने त्यांना निरोप देण्यात आला. काल आपला झालेला निरोप समारंभ हा मात्र खटकणारा विषय आहे.
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ या नात्याने कोरोना काळातील आपल्या कार्याची या चौथा आधारस्तंभाने भरभरून प्रशंसा केली, आता आपण जाताना चुकले म्हणून ती चूक आपल्या निदर्शनास आणून द्यावी, यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. कोणतीही द्वेषभावना मनामध्ये न ठेवता लोकभावना लेखणीच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा हा प्रयत्न आहे.
अखेर आपण चुकले एवढं मात्र आम्ही या निमित्ताने आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो.