चंद्रपूर,18 सप्टेंबर: राज्य गृह विभागाने चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली केली असून त्यांच्या जागेवर अरविंद साळवे यांची नियुक्ती केली आहे.जिल्ह्यात कोरोना महामारी ने थैमान घातले असतांना तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या नंतर आता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात आली आहे.
विदर्भातील भंडारा येथे कार्यरत असलेले अरविंद साळवे यांची आता चंद्रपूरच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.दरम्यान,डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या बदलीचे स्थान अजून निश्चित करण्यात आलेले नाही,त्यांच्या सह राज्यातील अन्य काही पोलिस अधीक्षकांचे पदस्थापने बाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे.