चंद्रपूर, दि. 17 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 294 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 हजार 976 झाली आहे. यापैकी 3 हजार 836 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 3 हजार 45 कोरोना बाधितावर सध्या उपचार सुरू आहेत.
आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 6 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, रयतवारी कॉलरी, चंद्रपूर येथील 40 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
दुसरा मृत्यू क्राईस्ट हॉस्पिटल परिसर, चंद्रपुर येथील 68 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
तिसरा मृत्यू टीचर कॉलनी परिसर, चिमुर येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
चवथा मृत्यु बाबुपेठ, चंद्रपूर येथील 75 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनिया असल्याने सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
पाचवा मृत्यू अंबादेवी वार्ड, वरोरा येथील 70 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
सहावा मृत्यू शेषनगर ब्रह्मपुरी येथील 62 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 95 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 88, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली दोन,यवतमाळ तीन बाधितांचा समावेश आहे.
जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 162 बाधित, कोरपना तालुक्यातील 5, चिमूर तालुक्यातील 3, नागभीड तालुक्यातील 5, बल्लारपूर तालुक्यातील 38, ब्रह्मपुरी तालुक्यातील 21, भद्रावती तालुक्यातील 18, मूल तालुक्यातील 3, राजुरा तालुक्यातील 8, वरोरा तालुक्यातील 8, सावली तालुक्यातील 8, सिंदेवाही तालुक्यातील 10, वडसा- गडचिरोली, गोंदिया येथील प्रत्येकी एक व नागपूर येथील 3 असे एकूण 294 बाधित पुढे आले आहे.
या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:
चंद्रपूर शहरातील महाकाली वार्ड, एसटी वर्कशॉप परिसर, बाबुपेठ, महाकाली कॉलनी परिसर, माता नगर चौक, निर्माण नगर, रयतवारी कॉलनी परिसर, सुभाष नगर घुगुस, नगीना बाग, समाधी वार्ड, छत्रपती नगर, शांतीनगर, दादमहल वार्ड, रामनगर, वडगाव, एकोरी वार्ड, चिंचाळा, मोरवा, बंगाली कॅम्प, तुळसी नगर परिसरातून बाधित पुढे आले आहे.
ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:
बल्लारपूर तालुक्यातील गांधी वार्ड, साई बाबा वार्ड, कन्नमवार वार्ड, विवेकानंद वार्ड, सरकार नगर, समता चौक, जुनी दहेली, भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी, शांतीनगर, गांधी वार्ड, वडसा, विद्यानगर, गाडगे नगर, टिळक नगर, बालाजी वार्ड, परिसरातून बाधित पुढे आले आहे.
भद्रावती तालुक्यातील अहील्यादेवी नगर, गणेश मंदिर रोड परिसर, गौतम नगर , माजरी, गणपती वार्ड गौराळा, चैतन्य कॉलनी परिसरातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील जामसाळा, रत्नापूर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.