चंद्रपूर:भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांचा 70 वा वाढदिवस भाजपा तर्फे सेवा सप्ताह म्हणून पाडला जात आहे. या निमित्ताने चंद्रपूर महानगरात दि 17 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर पर्यंत पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या वतीने स्थानिक गिरनार चौकातील भाजपा कार्यालयात आज नागरिकांना विविध प्रकारचे ज्युस व ओ आर एस चे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी अहीर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे 70 व्या वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन करून त्यांच्या नेतृत्वात भारत आत्मनिर्भर आणि जागतिक महासत्ता होईल असा विश्वास व्यक्त करून त्यांना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या. या ज्यूस वाटप कार्यक्रमाला भाजपाचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनीसुद्धा पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा देत भाजपतर्फे सेवा काळात अन्य सेवाकार्य करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरसेवक राजेंद्र अडपेवार, युवा मोर्चा अध्यक्ष चंद्रपूर महानगर विशाल निंबाळकर, मोहन चौधरी, सचिन ठमके, मुकेश यादव, राहुल बोरकर, अमोल खोरे, चेतन शर्मा, गंगाधर कुंटेवर, कमलेश आवळे यांनी परिश्रम घेतले.