चंद्रपूर, दि. 2 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 182 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 हजार 945 झाली आहे. यापैकी 1 हजार 381 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 1 हजार 532 कोरोना बाधितावर सध्या उपचार सुरू आहेत.
आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासांमध्ये 3 कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये रामनगर चंद्रपूर येथील 82 वर्षीय पुरूष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 28 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 1 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे.
दुसरा मृत्यु हा 48 वर्षीय वडसा, गडचिरोली येथील पुरुष बाधिताचा झाला आहे. 1 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले होते. 1 सप्टेंबरलाच सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. बाधिताला कोरोना व्यतिरिक्त उच्चरक्तदाब तसेच श्वसनाचा आजार होता.
तर, तिसरा मृत्यु हा 65 वर्षीय श्री.साई प्लाझा परीसर कबीर नगर, मुल रोड चंद्रपूर येथील महिला बाधितेचा झाला आहे. 30 ऑगस्टला बाधितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 2 सप्टेंबरला पहाटे बाधितेचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधितेला कोरोनासह न्युमोनिया होता. जिल्ह्यात आतापर्यंत 32 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी, चंद्रपूर 28, तेलंगाणा एक, बुलडाणा एक आणि गडचिरोली 2 बाधितांचा समावेश आहे.
24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 129, नागभीड 3, पोंभूर्णा एक, बल्लारपूर 20, ब्रह्मपुरी, मुल, गोंडपिपरी येथील प्रत्येकी 2, भद्रावती 3, राजुरा 19 असे एकूण 182 बाधितांचा समावेश आहे.
चंद्रपूर शहरातील शासकिय वैद्यकिय महाविदयालय परीसर, रयतवारी कॉलनी, दादमहल वार्ड, पठाणपुरा वार्ड, जटपुरा गेट परीसर, सराफा लाईन, जिल्हा कारागृह, अंचलेश्वर वार्ड, मिलिंद चौक, विद्या विहार कॉन्हेंट परीसर, घुटकाळा वार्ड, एकोरी वार्ड, शांती पार्क कॉलनी परीसर, जेबी नगर, भानापेठ वार्ड, विवेक नगर, बाबुपेठ, पटेल नगर, मुल रोड परीसर, तुकुम, बंगाली कॅम्प, रामनगर, विठ्ठल मंदिर वार्ड, समाधी वार्ड, नेहरु नगर, जीवन साफल्य कॉलनी, सिस्टर कॉलनी, क्रिष्णा नगर, महाकाली वार्ड, श्रीराम वार्ड, भिवापूर वार्ड, सुदामा गल्ली, आझाद वार्ड व कन्नमवार वार्ड परिसरातील तसेच तालुक्यातील दुर्गापूर, घुघुग्स, वाघोली, कोसारा गावातून पॉझिटिव्ह ठरले आहेत. पोंभुर्णा तालुक्यातील पिपरी दिक्षीत, दिगोरी, बल्लारपूर शहरातील रानी लक्ष्मी वार्ड, संतोषी माता वार्ड, गांधी वार्ड, रेल्वे वार्ड, शिव नगर वार्ड व महाराणा प्रताप वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहेत.
ब्रम्हपूरी तालुक्यातील बेटाळा व देलनवाडीतून बाधित ठरले आहेत. भद्रावती तालुक्यातील माजरी, विजासन व कोकेवाडा परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहेत.
मुल तालुक्यातील चिंचाळा येथुन बाधित पुढे आले आहेत. राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन भागातील व चुनाभट्टी वार्ड परीसरातील बाधीत ठरले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील वाघोली येथील बाधित ठरले आहेत.