चंद्रपूर:30 ऑगस्ट
देशासह राज्यात कोरोनाचा थैमान दिवसेंदिवस वाढत चालला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात देखील कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे.चंद्रपूर शहरात कोरोनाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. चंद्रपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंद्रपूरच्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या ७१ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कारागृहातील कैदी कोरोनाबाधित आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या २०७४ असून २५ बाधितांचा मृत्यू झाला आहे.११७६ बाधित बरे झाले असून ८७३ बाधितांवर उपचार सुरु आहे.
——————————————————————————
कारागृहातील ७१ कैद्यांना व एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण
चंद्रपूर शहरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृह हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे.कारागृहातील ७१ कैदी व १ कर्मचारी एकूण ७२ जणांना एकाच दिवशी कोरोनाची लागण झाली असल्याची बाब उघड झाली आहे. लागण झालेल्या सर्व कैद्यांना दुसऱ्या कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कैद्यांना कारागृहात घेऊन जात असताना, एका कैद्याला दुसऱ्या कैद्यांपासून वेगळे ठेवले जात असते. प्रत्येक कैद्याची कोरोनाची चाचणी केली जाते, जर का कैद्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आला तरच कैद्याला जेल मध्ये पाठवले जाते. कैद्याचा कोरोना अहवाल सकारात्मक आला तर त्याला उपचारासाठी पाठवण्यात येते. मात्र अशी व्यवस्था असून देखील एकाच वेळी ७१ कैद्यांचा अहवाल सकारात्मक आल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहे.