चंद्रपूर,23:कोरोना संसर्ग काळामध्ये यंदाचा गणपती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. गणपती उत्सव डिजिटल व आरोग्य उत्सव साजरा करता यावा. यासाठी हनुमान नगर गणेश मंडळ हनुमान मंदिर तुकूम तर्फे डिजिटल स्पर्धा व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
यावर्षीचा गणपती उत्सव त्याच जोशात व त्यांच जोमात डिजीटल पध्दतीने @hanumannagarganeshmandal या फेसबुक पेजवर साजरा होनार आहे. विविध डिजिटल रेलचेल असणार आहे. या डिजिटल स्पर्धेमध्ये निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,फॅन्सी ड्रेस स्पर्धा यांचा समावेश आहे.
निबंध स्पर्धेत लोकलमध्ये मजा येते की सजा? थांबलेलं जग कसं वाटतंय या दोन विषयावर होनार आहे. या दोन विषयावर अनुक्रमे 8 ते 14 व 14 ते 30 वयोगटासाठी असणार आहे. निबंध हा फक्त 250 शब्दातच असणे गरजेचे आहे.
चित्रकला स्पर्धा 8 ते 14 वयोगटासाठी वन आणि वन्यजीव (ताडोबा) तर 14 ते 30 वयोगटासाठी भारत जोडो किंवा स्वच्छ भारत या विषयावर असणार आहे. चित्राचा आकार एफोर किंवा एथ्री असावा.
रांगोळी स्पर्धा कोरोना योद्धावरील संदेश व घरी राहा, सुरक्षित रहा या विषयावर आधारित आहे.
फॅन्सी ड्रेस स्पर्धा 1 ते 14 वर्ष वयोगटासाठी असणार आहे. स्पर्धकांचा 3 फोटो व एक मिनिटाचा व्हिडिओ 9975794700, 9075955106 या व्हाट्सअप क्रमांकावर दिनांक 28 ऑगस्ट पर्यंत पाठवावा.
घरगुती गणपती सजावट स्पर्धेत सुद्धा स्पर्धकांना भाग घेता येईल. कोरोना योध्दा संदेशात्मक असल्यास प्राधान्य देण्यात येईल. स्पर्धेचे नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत. स्पर्धकाने आधार कार्डचा फोटो पाठवावा. बक्षिस वितरण दिना़क 30 ऑगस्टला करण्यात येईल. त्याची माहिती मंडळाच्या फेसबुक पेज वर देण्यात येईल, स्पर्धकांकरीता आकर्षक बक्षिसे देण्यात येईल, परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
आरोग्य उत्सव-रक्तदान शिबीराचे आयोजन:
दिनांक 28 ऑगस्ट पर्यंत नोंदणी 9975794700, 9075955106 या व्हाट्सअप क्रमांकावर करावी. शिबीराची तारीख व वेळ आपणास कठविण्यात येईल. या शिबिराचे आयोजन सोशल डिस्टन्सिंग ठेऊन करण्यात येईल.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिशताब्दी वर्षा निमित्य ऑनलाईन व्याख्यान व आरोग्य जनजागृती पर कार्यक्रम राहील.
बाप्पाचे दर्शन व दररोजची आरतीचे थेट प्रक्षेपण @hanumannagarganeshmandal या फेसबुक पेजवर करण्यात येईल.