चंद्रपूर:१९ ऑगस्ट
कोरोना महामारीमुळे जवळपास चार ते पाच महिन्यापासून आगारात थांबलेली ‘लालपरी’ अखेर २० ऑगस्टपासून रस्त्यावर धावणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
एका बाकावर एक प्रवाशी प्रवास करतील तसेच प्रवाश्यांना प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नसल्याचे सांगितले जात आहे.मात्र खाजगी वाहनाने प्रवास केल्यास ई-पास बंधनकारक आहे.प्रवाशांना मास्क बंधनकारक राहील. मास्क नसल्यास रुमाल नाका- तोंडाला बांधणे बंधनकारक राहील.
प्रवाशांना तालुक्यातून, जिल्ह्यातून, व महाराष्ट्रातून सर्व ठिकाणी जाता येता येईल .सर्व प्रकारचे प्रवासी,ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, या सर्व प्रवाशांना प्रवास करता येईल.कुठलीही भाडेवाढ न करता प्रवाश्यांसाठी ही सोय करण्यात आली आहे.
एस.टी.प्रवाशी सेवा फक्त महाराष्ट्रा पुरती मर्यादित असून महाराष्ट्रा बाहेर इतर राज्यात प्रवासासाठी परवानगी नाही.राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या लालपरी अर्धात महामंडळची साधी गाडी प्रवास्यांच्या सेवेत असणार असून इतर बसेस टप्याटप्याने सुरू केल्या जाणार आहे.